आमच्याविषयी
आमच्याविषयी
माझं व्यासपीठ या यूट्यूब पॉडकास्ट चॅनलचे निर्माते आहेत शुभदा मिलिंद इजरेकर, मिलिंद इजरेकर आणि आनंद देशमुख. ही आप-आपल्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी असून एका अंतप्रेरणेने भारून त्यांनी या पॉडकास्ट चॅनलची निर्मिती केली आहे. रेडिओवर निवेदिका म्हणून कार्य केलेल्या अनुभवी शुभदा इजरेकर या माझं व्यासपीठ च्या मुलाखतकार असून मिलिंद इजरेकर हे कार्यक्रमाचे सहाय्यक आहेत. डिजिटल लर्निंग / नाट्यक्षेत्र / डिजिटल मीडियाचा अनुभव असलेले आनंद देशमुख हे चित्रीकरण / संकलन / डिजिटल कंटेंट निर्मिती / प्रमोशन या बाजू सांभाळतात.