माझं व्यासपीठ (BUSINESS PODCAST) ची वैशिष्ट्ये  

·      ‘माझं व्यासपीठ’ मध्ये आम्ही आपली मुलाखत घेतो ज्यात आपल्या व्यवसायाशी निगडित सर्व माहिती समाविष्ट करून घेतो. ही मुलाखत म्हणजे विश्वासार्हता निर्माण करण्याचे साधन आहे. तुम्हाला तुमचे कायमस्वरूपी ग्राहक मिळवायचे असतील तर त्याला हवी पारदर्शकता जी तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते हे काम ‘माझं व्यासपीठ’ च्या मुलाखतीच्या द्वारेच होवू शकते. तुमचे व्यक्तिमत्त्व खुलवून प्रेक्षकांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘माझं व्यासपीठ’ च्या अनुभवसंपन्न संचालिका , शुभदा इजरेकर सहजतेने करतात.

·        आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी चित्रीकरण करून ते सुध्दा आपण आपल्या मुलाखती दरम्यान समाविष्ट करू शकतो*.

·        आपली मुलाखत ही यूट्यूबवर कायमस्वरूपी राहते. त्यामुळे आपण त्याचा पुढेही उपयोग करून घेवू शकता. 

·      आपली मुलाखत आम्ही सोशल मिडियाद्वारे प्रमोट करतो ज्यामुळे तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचता. (आपल्या व्यवसायानुसार आम्ही ती शहरं, राज्य, देश आणि विदेशांतही पोहोचोंवतो.)